पोलिसांनी सापळा रचून अवैध वाळू उपसा विरोधात धडक कारवाई

क्राइम

४५ लाख रुपये किंमतिचा मुद्देमाल जप्त,कात्री घाटावर अल्लिपुर पोलिसांची कारवाई

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर पोलिसांनी अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला असुन पोलिसांनी १ मेला ३ वाजता कात्री घाटावर अवैध वाळू उपश्या विरोधात धडक कारवाई करीत ४५ लाख रुपयांचे किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आज २ मेला पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. अल्लिपुर पोलिसांना कात्री लगत असलेल्या वर्धा नदीतुन बोटीचे व मशिनचे सहायाने वाळुचा अवैध उपसा होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी कात्री घाटावर सापळा रचून या ठिकाणावरून ४५ लाख रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रफुल डाहुले पोलिस कर्मचारी राहुल नव्हाते, अनुप नाईक, प्रफुल चंदनखेडे , सतिश हांडे, योगेश चंदनखेडे गणेश कन्नाके यांनी केली आहे.

CLICK TO SHARE