पोलीसांनी सापळा रचून अवैध वाळूची तस्करी करणारे ३ टीप्पर केले जप्त

क्राइम

साती घाटावर अल्लिपुर पोलिसांची कारवाई

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

अल्लीपूर पोलीस स्टेशन च्या कार्यशेत्रात येणाऱ्या वर्धा नदिच्या साती घाटावर पोलिसांनी अवैध वाळू उपशा विरोधात कारवाई करीत५५लाख रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आज २ मेरोजी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्यामाहितीनुसार अल्लिपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्याआधारे पोलिसांनी १ मेला रात्री २ वाजता वर्धा नदीचे काठावरअसलेल्या साती घाटावर सापळा रचून कारवाई करीत याठिकाणाहून ३ टिप्पर सह ५५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमालजप्त केला. हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीसअधिकारी राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रफुल डाहुलेपोलिस कर्मचारी राहुल नव्हाते, अनुप नाईक, प्रफुल चंदनखेडे, सतिश हांडे, योगेश चंदनखेडे गणेश कन्नाके यांनी केली आहे.

CLICK TO SHARE