अवैद्य गौण खनिज 1 करोड 33 लाख 9 हजार रुपयाचा माल जप्त

क्राइम

प्रतिनिधी:सचिन वाघे हिंगणघाट

दि.02 मे 2024 रोजी मुखबीरकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मा. वृश्टी जैन भा. पो. से. प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणचे पथकाने मौजा कवडघाट येथील हिंगणघाट वर्धा रोडवर नाकेबंदी केली असता नाकेबंदी दरम्याण तीन टिप्पर व एक एल.पी .16 टायर ट्रक थाबवुन त्याची पाहणी केली असता ट्रक मध्ये काळी रेती ( गौण खनीज ) दिसल्याने टिप्पर व ट्रक चालकास रेती कोठुन आणली व रेतीची राॅयल्टी बाबत विचारपुस केली असता सदर टिप्पर व ट्रकचे चालकाने रेती मौजा दारोडा शेत शिवारातील वना नदीचे पात्रातुन आणल्याचे सांगुण राॅयल्टी नसल्याचे सांगीतल्याने सदर तीन्ही टिप्पर व एक एल. पी. ट्रक चे चालक व क्लीनर यांचे ताब्यातुन तीन टिप्पर व ट्रक मध्ये काळी रेती ( गौण खनिज ) अंदाजे 43 ब्रास काळी रेती प्रति ब्रास 6000/रू. प्रमाणे किं. 2,58,000/- रू. 02) तीन टिप्पर क्र. एम एच 27 बी एक्स 6691, एम एच 37 डी जी 5770 व एम एच 27 बी एक्स 6494 असा असलेले टिप्पर तीन्ही टिप्पर ची अंदाजे किं. 90,00,000/- रू. एक एल पी 16 चक्का ट्रक क्र. एम. एच 27 बी डी 7982 असा असलेला ट्रकची अंदाजे किं. 40,00,000/- रू. 3) अँड्रॉईड मोबाईल अंदाजे किमत 51,000/रू. असा एकुण जु. किं. 1,33,09,000/रू. चा माल आरोपी सय्यद आसीफ अली सय्यद साहेबअली वय 35 वर्ष, सलीम वहीद खा पठाण वय 25 वर्ष दोन्ही रा. कठोरा (गांधी ) त.जि. अमरावती, प्रफुल उत्तमराव केने वय 38 वर्ष रा. प्रविण नगर अमरावती, कुणाल मोहनराव घुले वय 28 वर्ष रा. राहाटगाव त.जि. अमरावती वृतीक रमेष साबळे वय 21 वर्ष रा. अनकवाडी त. तिवसा जि. अमरावती, आदेष मुंडे ( पसार ) रा. रघुनाथपुर त. तिवसा जि. अमरावती एल पी ट्रक क्र. एम एच 29 बी डी 7982 यांचे ताब्यातुन मौका जप्त पंचनामा कारवाई प्रमाणे जप्त करून नमुद आरोपीतांना ट्रक बाबत विचारपुस केली असता सदरचे टिप्पर हे मिलींद मनोहर जवंजाळ रा. नांदगाव पेठ अमरावती, सचिन निस्ताणे राहाटगाव त.जि. अमरावती व आकाश देविदास डेहणकर रा. मोझरी त. जि. अमरावती यांचे मालकीचे असुन त्यांचे सांगणेवरून सदरची रेतीची आम्ही वाहतुक करित आहे असे सांगीतल्याने नमुद आरोपीतां विरूध्द गुन्हा नेांद करून तपासात घेतला. सदरची कारवाई मा. नुरूल हसन सा. पोलीस अधिक्षक वर्धा, मा. डाॅ. सागर कवडे सा. अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. रोशन पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात मा. वृश्टी जैन भा. पो. से. प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. उप.नि. लक्ष्मीकांत दुर्गे, पो. हवा. प्रविण देषमुख, सुनिल मळणकर, पो. ना. सुनिल मेंढे, नरेंद्र आरेकर, पो.षि. विजय हारनुर, जफर षेख यांनी केली आहे.

CLICK TO SHARE