एकदिवसीय ‘आंबा महोत्सव’ 7 मे रोजी

बिज़नेस

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

जिल्ह्यात आंबा या पिकाची फळबाग लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून उत्पादित आंब्याला बाजारपेठ, फळ पिकांचे निर्यातक्षम उत्पादन, विक्री व्यवस्थापन करणे व यामाध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत उपजिविकेचे साधन उपलब्ध करून देणे, या उद्देशाने 7 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता एकदिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्ह्यात आंबा पिकाचे क्षेत्र वाढविणे तसेच उत्पादित फळ पिकांचे निर्यातक्षम उत्पादन आणि योग्य विक्री व्यवस्थापन, जिल्ह्यातील जमीन आणि हवामान याबाबत कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ (आंबा फळपीक तज्ज्ञ) डॉ. भगवान कापसे, महा केसर आंबा बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष बाळासाहेब उगले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकदिवसीय आंबा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

CLICK TO SHARE