जागतिक साळी फाउंडेशन,वर्धा परिवाराच्या वतीने पार पडले सक्षमीकरण

सोशल

सामाजिक व शैक्षणिक विषयावरील चर्चासत्र व विद्यार्थी युवा युवतींचा सत्कार सोहळा

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी आश्रम सेवाग्राम येथे जागतिक साळी फाउंडेशन वर्धा परिवाराच्या वतीने महिला सक्षमीकरण, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विषयावरील चर्चा सत्राचे आयोजन 4 मे 2024 रोजी पार पडले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रकाशरावजी बुरांडे, वर्धा सेवानिवृत्त जिल्हा शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, प्रमुख अतिथि तथा मार्गदर्शक, श्री. विजयजी नारायणराव वक्ते, संस्थापक जागतिक साळी फाउंडेशन तथा कक्ष अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई, श्री. प्रल्हादरावजी यावलकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जल संपदा विभाग महाराष्ट्र शासन, श्री. प्रल्हादरावजी कोठेकर सेवानिवृत हवाईदल अधिकारी, श्री. देवीदासजी कलाने, अध्यक्ष नागपूर जिल्हा wsf प्रमुख, श्री. भरतजी खोकले सचिव, साळी समाज मंडळ नागपुर, श्री. अरुणराव बुरांडे ,उपाध्यक्ष साळी समाज मंडळ नागपुर, श्री. राजेंद्रजी क्षीरसागर सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच वर्धा जिल्ह्यातील साळी समाज महिला पुरुष मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने भगवान श्री.जिव्हेश्वर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती ने करण्यात आली. कार्यक्रमामध्ये वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील साळी कन्या कु. भक्ति संतोषराव फंड ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन जलसांधरण अधिकारी राजपत्रित या पदावर निवड झाल्यामुळे तिच्या कुटुंबाचा सत्कार शाल श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून श्री. विजयराव वक्ते यांच्या हस्ते करण्यात आला. सदर विद्यार्थिनी साळी समाजातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करणारी वर्धा जिल्ह्यातील पहिली व्यक्ति आहे. तसेच सदर विद्यार्थिनी ही अतिशय गरीब कुटुंबातील असून वडील वाहनचालक आहे व आई गृहिणी व शिवणकाम करते. यवतमाळ येथील श्री. राजेंद्रजी क्षीरसागर, सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता यांचे चिरंजीव श्रीराम राजेंद्रजी क्षीरसागर यांचे NDA अंतर्गत भारतीय वायु सेना मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अचलपूर जि. अमरावती येथील ह.भ.प स्व. श्री. हरीदासजी गंगारामजी भागवत, कीर्तनकर, प्रबोधनकार, लेखक, सेवानिवृत्त पर्यवेक्षक तसेच जागतिक साळी फाउंडेशन, मुंबई चे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष, यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रातील बहुमोल कार्याबद्दल wsf वर्धा च्या वतीने मरणोत्तर स्वकुळ भूषण पुरस्कार कुटुंबातील सदस्य पत्नी श्रीमती विमलताई भागवत ,मुलगा श्री मिलींदजी भागवत ,सुन सौ.स्वातीताई भागवत यांना प्रदान करण्यात आला. यानंतर जागतिक साळी फाउंडेशन चे संस्थापक श्री. विजयजी नारायण वक्ते साहेब यांनी जागतिक साळी फाउंडेशनचे सामाजीक क्षेत्रातील कार्याची विस्तृत माहिती उपस्थितांना विषद करून, सामाजिक शैक्षणिक व आर्थिक, महिला सक्षमीकरन विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालण सौ.साधणाताई कोठेकर यांनी केले,आभारप्रदर्शन श्री.सुरेंद्रजी लव्हाळे यांनी केले.

CLICK TO SHARE