छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनानिमित्त जयंती परिवर्तनाची विशेषांक चे प्रकाशन

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील मोझरी शेकापूर येथे फुले शाहू आंबेडकर विचार मंच च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वाचून साजरी करावी या हेतूने स्थानिक गावकरी लेखक व कवीच्या मनात जयंती परिवर्तनाची हा विशेषांक काढून फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर लेख व कविता बाहेर गावातील व शहरातील साहित्यिक व लेखकाकडून मागवून त्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आले. सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिनानिमित्त जयंती परिवर्तनाची या विशेषांकाचे प्रकाशन ऑल इंडिया समता सैनिक दलाचे विदर्भ सचिव रमेश निमसडकर यांचे अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे तालुका अध्यक्ष महेश मसराम, ऑल इंडिया समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष नुरुल तडसे, गावचे माजी सरपंच राजू धोबे, उपसरपंच शुभ्रबुद्ध कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत ढुमणे, अमोल गायकवाड, ऑल इंडिया समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष प्रा. सुशील मून यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज व जयंती परिवर्तनाची या विशेषांकाच्या लेख आणि कविता यावर भाष्य केले. मान्यवरांनी गावामध्ये अभ्यासिका व वाचन कक्ष निर्माण व्हावे जेणेकरून येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतील व वाचनाची ओढ निर्माण होऊन चांगले लेखक व कवी निर्माण होईल अशा आशा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुशील मून यांनी केले तर संचालन प्रभू डोळे व उपस्थितांचे आभार डॉ.प्रमोद कांबळे यांनी मानले. विशेषांक चे यशस्वीतेकरिता प्रा. रवींद्र पाटील, सिद्धार्थ मेहेरे, बंडू कांबळे, प्रवीण कांबळे, प्रतीक मुंजेवार, राजू वाघमारे, प्रा. सन्मुख खोब्रागडे, विनोद कांबळे, राहुल तेलंग यांचे सहकार्य लाभले.

CLICK TO SHARE