सहकार महर्षी बापुरावजी देशमुख यांची जयंती साजरी

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

स्थानीक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,अल्लीपूर येथे दि.०९/०५/२०२४ रोजी सहकार महर्षीलोकनेते श्रध्देय दाआजीबापुरावजी देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्या स्मिता ढोकणे मॅडम यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आला.शिक्षण हे शाळा महाविद्यालयातून तर दिले जातेच पण त्याचे लोण खेड्या पाड्यातील गरिबांच्या झोपडी पर्यंत पोहचविण्याचे कार्य मी जास्त मोलाचे समजतो असे अभिवादन ढोकणे मॅडम यांनी केले यावेळी कडू मॅडम,भोयर सर , हाडके सर, सोळंकी सर , रामटेके सर,सावदे सर, झाडे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी सुभाष राऊत, देवीदास वैद्य सेवानिवृत्त दिलीप लांभाडे उपस्थित होते.

CLICK TO SHARE