मातृवृक्ष बहुउद्देशीय संस्था द्वारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य जी बी एम एम विद्यालय येथे विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

एज्युकेशन

प्रतिनिधी:आसीफ मलसन हिंगणघाट

हिंगणघाट /दि ०९ / 0५ / २०२४मातृवृक्ष शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांचे वतीने दिनांक १४/०४/२०२४ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्य विद्यार्थांसाठी भाषण स्पर्धा , चित्रकला स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली. भाषण स्पर्धेचे विषय पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना ‘’डॉ. बाबासाहेब आंबेडकर काल आणि आज’’ हे होते. तर चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एैतीहासिक प्रसंग या विषयाला अनुसरून चित्रे काढायची होती. तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा हि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित घेण्यात आली. स्पर्धेत १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिनांक ०९/०५/ २०२४ ला स्थानीय जी बी एम एम हायस्कूल मध्ये करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृवृक्ष संस्थेचे सचिव श्री किशोर उकेकर हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जी बी एम एम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.एस.आर.फुटाने, उपमुख्याध्यापक श्री एम एस कुरेशी तसेच पर्यवेक्षक श्री संजय तराळे सर व मातृवृक्ष संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अनिस बेग उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार अनुश्री जेठाराम सुथार ८ क तर द्वितीय पुरस्कार प्रेम घनशाम मेलेकर ७ क व तृतीय पुरस्कार प्रणाली किशोर हिवरे ११ अ यांनी पटकावला प्रोत्साहन पुरस्कार रितिका रमेश बावनकर वर्ग ८ अ व ख़ुशी वाघमारे ८ क या विद्यार्थ्यांनी मिळविला. सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम पुरस्कार काजल मोहन खंडाळे ११ अ व द्वितीय पुरस्कार श्रावणी रुपेश पराते ८ क आणि तृतीय पुरस्कार संस्कार प्रकाश मेश्राम ७ क या विद्यार्थिनींनी मिळविला. प्रोत्साहन पुरस्कार कबीर शाम विजय ८ क, कनक महेद्र कटारे ६ क , निशांत नितीन माडेवार ६ क , पूर्वी हरीश डेकाटे ५ क व नाझिया शेख नवाब ९ ब यांना मिळाला.भाषण स्पर्धेत पूनम विजय पंचभाई, तन्वी उमाकांत उघडे,कबीर शाम विजय,श्रावणी रुपेश पराते,या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर रीत्या विषय मांडले. कार्यक्रमाचे संचालन श्री डी जी पवार यांनी केले तर आभार आर यम कनाके यांनी मानले . प्रास्ताविक मातृवृक्ष संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अनिस बेग यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मातृवृक्ष बहुउद्देशीय संस्थेचे कोषांध्यक्ष श्री त्रिरत्न नागदेवे व सर्व पदाधिकारी आणि जी बी एम एम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम केले. असेच शैक्षणिक कार्यक्रम भविष्यात व्हावे असे विद्यार्थी व पालकांनी आपले अभिप्राय मांडले

CLICK TO SHARE