आरोग्य विज्ञान विद्या पीठातील एकांकीका स्पर्धेत एम.एस.आयुर्वेद महाविद्यालया ला मिलाले प्रथम परीतोषिक

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

नुकताच एम एस आयुर्वेद महा विधालयाला पंचेविस् वर्षे पूर्ण झाली आहेत.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत युवा स्पंदन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .युवा स्पंदन या कार्यक्रमामधील नाट्यकला या विभागाच्या स्पर्धा,पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती येथे २२ आणि २३ एप्रिल ला घेण्यात आल्या .या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४९ महाविद्यालयांनी भाग घेतला . या स्पर्धेत एक अंकी नाट्य स्पर्धेत एम. एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज गोंदिया च्या चमूने प्रथम क्रमांक पटकावला.महाविद्यालयाच्या चमूने “ये कैसी है विदाई” हि एकांकिका सादर केली . स्त्री भरून हत्या हि या नाटकाची मध्यवर्ती कल्पना डॉ.डी.यू.पाठक यांनी लिहिलेल्या कादंबरी वॉर आधारित होती, नाट्य संहिता लेखिका डॉ वंदना अलोनी यांची तसेच दिग्दर्शन डॉ वंदना अलोनी आणि डॉ प्रियांका वटे यांनी केले तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ जयमाला शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले या संपूर्ण एकांकिकेचे प्रेरणा स्थान संस्थेचे संचालक डॉक्टर सुरेश कटरे सर आणि श्रीमती मीनाक्षी कटरे हे होते.हि एकांकिका महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली . स्त्री भ्रूण हत्या होताना गर्भातील मुलींवर त्याचा कसा परिणाम होतो हे प्रभावीपणे सादर करून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध तसेच विचार प्रवण करणारे हे नाटक होते . सर्व कलाकारांची सहज अभिनय करण्याची क्षमता तसेच वेशभूषा आणि प्रकाश योजना हि उत्तम होती .अश्या विषयावरील नाटक हे जनजागराचे उत्तम साधन ठरू शकते . एम एस आयुर्वेद महाविद्यालय हे MUHS अंतर्गत NAAC मान्यता प्राप्त करणारे महाराष्ट्र मधील चौथे आणि विदर्भ मधील पहिले आयुर्वेद महाविद्यालय आहे.

CLICK TO SHARE