रेती माफीया वानखेडे सह 4 टिप्पर वरती कारवाई

क्राइम

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यात महसूल विभागाची मोठी कारवाई रेती माफीया पंकज वानखेडे याच्या टिप्पर सह 3 टिप्पर वरती अल्लीपूर, शेकापूर व दारोडा परिसरात कारवाई करत जप्त केले जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे मार्गदर्शनात हिंगणघाटचे तहसिलदार मासाळ यांनी अवैध रेतीवाहतुकीचे विरुध्द 11 मे रोजी रात्री मोठी कारवाई केली आहे. रेती वाहतुक करणारे 4 टिप्पर जप्त करुन तहसिल मध्ये जमा केले आहे. व त्यांच्या विरुध्द दंडात्मक कारवाई सुरु आहे. जप्त केलेल्या टिप्पर मालकांची नावे पंकज वानखेडे, शुभम ढोक चंद्रकांत सुरसे व दिपक मेश्राम अशी आहेत.

CLICK TO SHARE