गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई,३४८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त

क्राइम

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनेगाव स्टेशन येथे रविवारी ११ मे ला ५ वाजताच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच ४० एक्स ०६७२ वर प्रशांत हिवरकर हा गावठी मोहा दारू वाहतूक करताना पोलिसांना आढळून आला यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी ४ हजार ८०० रुपये किंमतीची गावठी मोहा दारू असा एकूण ३४ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून प्रशांत हिवरकर यांच्या विरोधात अल्लिपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार डाहुले याच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे.

CLICK TO SHARE