अल्लीपूर ग्रामपंचायत च्या सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

अन्य

गेल्या अडीच महिन्यापासून पगार न मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी घेतला पवित्रा

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

काल दिनांक १४ मे रोजी अल्लीपूर चा आठवडी बाजार होता काल सकाळला कर्मचाऱ्यांनी संपूर्ण बाजार व्यवस्थित स्वच्छ केला परंतु बाजाराचा दिवस असून सुद्धा कर्मचाऱ्यांचे वेतन ठकीत असल्याने त्यांनी कामावर न येण्याचा निर्णय घेतला आणि आज संपूर्ण आठवडी बाजार हा कचरामय झालेला आहे व काही दिवसात *पाणीपुरवठा कर्मचारी सुद्धा असाच पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे* ज्याप्रमाणे आठवडी बाजार अस्वच्छ दिसतो त्याचप्रमाणे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर संपूर्ण गाव तहानलेल्या अवस्थेत दिसून येईल तरी प्रशासनाने योग्य वेळी योग्य दखल घेत कर्मचाऱ्यांचे पगार करावे व गावाला स्वच्छ व सुंदर ठेवण्यास प्रत्येक वेळेस म्हटले जाते की स्वच्छ व सुंदर ठेवण्यास ग्रामपंचायतला सहकार्य करावे परंतु पगार न दिल्यामुळे आज ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाचे विद्रूपीकरण करून ठेवले आहे तरी प्रशासनाने योग्य ती कारवाई करत कर्मचाऱ्यांचे पगार करावे व गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत करावी असं गावकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. आज पर्यंतच्या इतिहासात हा पहिला दिवस असेल की अल्लीपूर गावच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता न करण्याचा निर्णय घेतला याला सर्वात मोठे कारण म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गावावर असलेले दुर्लक्ष हेच मुख्य कारण दिसून येत आहे गेल्या एक महिन्यापासून ग्रामविकास अधिकारी हे गावात नसून त्यांना गावाचे काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे तरी शासनाने योग्य ती कारवाई करत अल्लीपूरची ही दयनीय अवस्था दूर करण्याचा प्रयत्न करावा

CLICK TO SHARE