तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
स्थानीक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अल्लीपूर येथे आज दिनांक 15. 5.2024 बुधवार ला सकाळी ठीक आठ वाजता इयत्ता पाच ते नऊ व 11 वी चा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य सन्माननीय स्मिताताई ढोकणे मॅडम होत्या. प्रमुख अतिथी शाळेचे जेष्ठ शिक्षक सन्माननीय भोयर सर, प्राध्यापक सोळंके सर, हाडके सर, सन्माननीय पालक फुलमाळी , सन्माननीय फुलझेले ताई होत्या. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली, तद्वतच मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन व शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. ढोकणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. नंतर प्रथम गुणांनुक्रमानुसार विद्यार्थ्यांना पारितोषिक व निकाल पत्रक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शिक्षिका कुमारी रूपा कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन मेश्राम मॅडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्याकरिता शाळेतील शिक्षक झाडे सर, मेश्राम मॅडम , सावदे सर, फरताडे सर, अंडरस्कर , माटे मॅडम, वैद्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली