मदना व देवग्राम परिसरात आढळला पट्टेदार वाघ,एकाच आठवड्यात दोन दा झाले दर्शन

वायरल

गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आव्हान,तहसीलदार व वन परिक्षेत्र अधिकारी नरखेड यांनी केली पाहणी.

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा (ता.17) नरखेड तालुक्यातील मदना ते देवग्राम रस्त्याच्या बाजूला असलेल्या महेंद्र वासाडे यांच्या शेतात रात्रीच्या वेळेस वाघ आढळून आला. एकाच आठवड्यात दोन दा एकाच ठिकाणी वाघ दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जलालखेडा ते मोवाड रस्त्याचे बांधकाम सुरू असून रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने मदना ते देवग्राम रस्त्याच्या कडेवर असलेल्या महेंद्र वासाडे यांच्या शेतात प्लॅन्ट तयार केला असून तिथे काही कामगादर सुध्दा राहतात. याच आठवड्यात दोन दा प्लॅन्टवर काम करणाऱ्या कामगाराला रात्रीच्या वेळेस वाघ दिसून आला. कामगारांनी दुरूनच वाघाचा फोटो सुध्दा घेतला. ते खूप घाबरलेले होते. कामगारांनी ही बाब वरिष्ठांना सांगितली. वरिष्ठांनी या बाबत वन विभागाला सांगितले. वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी डी.एन. बल्की, तहसीलदार उमेश खोडके व वन कर्मचारी त्या ठिकाणी पोहचली व त्यांनी त्या जागेची पाहणी केली. तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावणार असल्याचे सांगितले तसेच वन विभाग वाघाचा शोध घेत आहे. प्लांट वरील कामगारांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आजू बाजूच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असून रात्रीच्या वेळेस एकटे घरा बाहेर निघू नये , रात्रीच्या वेळेस शेतात जाणे टाकावे, लहान मुलांना घरा बाहेर पडू देऊ नये, जनावरे घराबाहेर न बांधता आता बांधावे अशा प्रकारची सावधगिरी घेण्याचे आव्हान तहसीलदार उमेश खोडके व वन विभाग यांनी नागरिकांना केले आहे.

CLICK TO SHARE