VWG कराटे स्पोर्ट असोसिएशन हिंगणघाट तर्फे उन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

खेल

प्रतिनिधी:कविता बैस हिंगणघाट

वीरा वॉरियर्स ग्रुप आणि VWG कराटे स्पोर्ट असोसिएशन हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय उन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबिर शहरातील भारत विद्यालय येथे पार पडले. शिबिरामध्ये एकूण 105 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता . या शिबिरामध्ये सेल्फ डिफेन्स, नानचाकू, चक्कर आणि कराटे यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण देण्याकरिता वर्धा येथून मुख्य प्रशिक्षक म्हणून मा. सिहान रमेश भगत सर यांना बोलविण्यात आले होते. त्यांनी प्रशिक्षणामध्ये दैनिक सराव पासून सुरू करत, कराटे प्रशिक्षण, आत्म-स्वरक्षण,लाठी इव्हेंट,नानचाकु इव्हेंट, चक्कर इव्हेंट, याचे प्रशिक्षण दिले आणि प्रशिक्षणानंतर अल्पो आहारात देण्यात आला . प्रशिक्षण सुरू असताना मा.रोहित राऊत (अध्यक्ष-सुरक्षा फाउंडेशन इंडिया), मा.गोलूभाऊ भोंगाडे (संचालक-गोल्डन पावर जिम), मा.मुस्तफा बक्श (क्रीडा मार्गदर्शक) , आणि अजय बारसागडे (फुटबॉल कोच) यांनी या शिबिराला भेट देऊन मुलांचा उत्साह वाढविला . तर हे शिबिर घेण्यासाठी मा. राजू कारवटकर सर (मुख्यद्यापक- भारत विद्यालय हिंगणघाट) यांनी सहकार्य केले.शिबिर रोहीत राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले.या शिबिराचे आयोजन VWG कराटे स्पोर्ट असोसिएशन कमिटी अध्यक्ष -चेतन दहिवलकर उपाध्यक्ष -चेतन बोरकर सचिव शुभांगी उमाटे , साहिल तेलहांडे, ओम बोटरे यांनी केले.

CLICK TO SHARE