बल्लारपूर येथील ऑटोमोबाईल असोशियन ची बैठक घेण्यात आली

टेक्नॉलॉजी

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : १६ मे बल्लारपूर येथील ऑटोमोबाईल असोसिएशनच्या स्थापनेसाठी बल्लारपूर येथील सर्व टू व्हीलर गॅरेज आणि ऑटोमोबाईलशी संबंधित दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आणि प्रत्येक महिन्याच्या १६ तारखेला सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा विचार केला जाईल असे बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आले.ऑटोमोबाईल असोसिएशनची स्थापना म्हणजे लहान-मोठे दुकानदारांनी एकत्र येऊन एकमेकांच्या पाठीशी उभे राहावे आणि गॅरेजमध्ये काम करणाऱ्या सर्व मेकॅनिक बांधवांना त्यांच्या कामाचा योग्य भाव मिळावा असाही निर्णय या बैठकीत घेण्यातआला.या बैठकीत सुपरऑटो चे नईमअशरफी,वैष्णवी ऑटोमोबाईल चे निरज पद्मावार,रजा ऑटोमोबाईलचे वशिम,ओम साई राम ऑटोमोबाईलचे फुटले, शाहू ऑटोमोबाईल, अरविंद स्पेअर पार्टस,बाळु साठे,अजीज कुकरेजा,फाजील वर्कशॉप, ओम साई स्कुटर, जनता गॅरेज, जनता गॅरेज वर्कशॉप अनिल ऑटोमोबाईल,अमीरचंद ऑटोमोबाईल,दीपक ऑटोमोबाईल,रामबाबु ऑटोमोबाईल, रोहन ऑटोमोबाईल,पिंटु ऑटोमोबाईल व सर्व दुकानदार उपस्थित होते.

CLICK TO SHARE