हिंगणघाट क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र येथे उन्हाळी शिबिराचा समारोप

खेल

प्रतिनिधी:अब्दुल कदीर बख्श हिंगणघाट

हिंगणघाट:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा व तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक 6 मे.2024 ते दिनांक 21मे2024 यादरम्यान हिंगणघाट तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उन्हाळी शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये फुटबॉल, कॅरम, बुद्धिबळ या खेळाचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला माननीय अनिल निमगडे सर क्रीडा अधिकारी वर्धा, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय किरण वैद्य प्राध्यापक विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर प्रदीप जोशी सर अनिल भाऊ भोंगाडे. मंगला ठक,इरफान खान, शाहिद रजा , अब्दुल कदीर बख्श , किक बॉक्सिंग प्रशिक्षक गोपी कोटेवार, नदीम शेख, अजय मुळे, क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा बख्श , रोहित राऊत, हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी एल खांडरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये प्राध्यापक किरण वैद्य यांनी विद्यार्थ्यांना शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. पालकांना त्यांनी आवाहन केले आपल्या पाल्याला एक तास तरी मैदानात पाठवावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये क्रीडा अधिकारी माननीय अनिल निमगडे सर यांनी क्रीडा संकुल याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन या क्रीडा संकुलामध्ये कोणकोणत्या सुविधा पुढील काळामध्ये उपलब्ध करून दिला जाईल याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना दिली. या कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक विनोद कोसुरकर सर, विनोद भुते सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा संयोजक बी. एल. खांडरे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे आभार क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा सर यांनी मांडली. शिबिरामध्ये सहभाग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, जेवणाची मेजवानी सुद्धा देण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता किड्स ब्राईट फ्यूचर्स क्लब मार्गदर्शक अजय बारसागडे, दामिनी राऊत अशरफ सय्यद, प्रणव भोंडे, रुद्राश मकरे, देवल खापर्डे आणि इतर खेळाडूंनी परिश्रम घेतले.

CLICK TO SHARE