शहीद अंकुश वाहुळकर यांच्यावर साश्रूनयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

देश

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत येथील गुंज या गावी घटना भारत माता कि जय अंकुश वाहुळकर अमर रहे च्या जयघोषात निघाली अंतयात्रा सेना तुकडीच्या शोक सलामीनंतर शहीद अंकुश वाहुळकर शाश्रू नैनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शहीद अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव सिक्कीम येथून गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे आणले असता तिथून सेनेच्या वाहनाने शुक्रवारी गुंज येथे सकाळी आणण्यात आले यावेळी घरासमोर शहीद अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर फुलांनी सजवलेल्या सेनेच्या वाहनात पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली भारत माता की जय शहीद अंकुश वाहुळकर अमर रहे च्या जयघोषाने गुंज गाव दणाणले अंतयात्रा शेतात पोहोचल्यानंतर श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला छत्रपती संभाजी नगर येथून आलेल्या महार रेजिमेंट सेनेच्या तुकडीने हवेत फेऱ्या झाडत शोक सलामी दिले यानंतर शहीद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सेनेचे अधिकारी, माजी संघटना सेनेचे पदाधिकारी , प्रशासकीय अधिकारी, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी, हिंगोली जिल्हा सह वसमत तालुक्यातील व हजारोंच्या संख्येने गावातील नागरिकांची उपस्थिती होती

CLICK TO SHARE