बेपत्ता सोहेल खान यांचा तातडीने शोध घ्या आमदार सुभाष धोटेच्या वेकोली प्रशासनाला सूचना

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या खदानीतुत वेकोली सुरक्षा रक्षक सोहेल खान २४ में २०२४ ला दुपारच्या सुमारास कर्तव्यावर असताना बेपत्ता झाल्याची घटना घडुन ३ ते ४ दिवस उलटूनही अजून पर्यंत त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. या गंभीर घटनेची दखल घेऊन आ.सुभाष धोटे यांनी आज घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बेपत्ता सोहेल खान यांच्या आई मुलेशा खान.पत्नी नाजीया खान आणि कुटुंबीय यांच्याशी संवाद साधला त्याचे म्हणणे ऐकून घेतले.माझा नवरा तीन, चार दिवसांपासून कामावर असताना बेपत्ता आहे. अजुनही काहीही सुगावा लागला नाही.आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पत्नी व कुटुंबीयांनी केली. याबाबत आ.सुभाष धोटे यांनी त्यांना तातडीने न्याय मिळवून देऊ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून जलदगतीने तपास मोहीम राबवून तातडीने शोध घेऊ असे आश्वस्त केले आणि वेकोली प्रशासन, पोलीस प्रशासनाला सदर गंभीर बाब लक्षात घेऊन सोहेल खान यांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या.तसेच वेकोलीने कामगारांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देऊन यापुढे अशा गंभीर घटना घडू नयेत यासाठी खान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचनाही दिल्या.  यावेळी वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे एरिया पर्सनल मॅनेजर रामानुजन, सास्ती सब एरिया मोहन क्रिष्णा, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, बल्लारपूर इंटकचे नेते शंकर दास,एरिया सचिव विश्वास साडवे, सास्ती ओपन कॉस्ट इंटक अध्यक्ष संतोष गटलेवार, कामगार नेते आर यादव, अनंता एकडे, विजय कानकाटे, महादेव तपासे, दिनकर वैद्य, दिलीप कनकुलवार,रवी डाहुले, मंमधुकर नरड, गेश उरकुडे, दिनेश जावरे, खान कुटुंबीय, यासह शेकडोंच्या संख्येने वेकोली कामगार उपस्थित होते.

CLICK TO SHARE