जनता हायस्कूल शेदूर्जनाघाट चां एस.एस.सी.बोर्ड परीक्षा 2024 चा निकाल 93.33 टक्के

एज्युकेशन

प्रतिनिधि:रवी वाहणे शेदूर्जनाघाट

मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड एस.एस.सी. परीक्षेमध्ये जनता हायस्कुल, शेंदुरजनाघाट मधून एकूण 105 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 98 विद्यार्थी पास झालेले आहेत तसेच सर्वेश गिरीशराव वानखडे या विद्यार्थ्याने 93.20 टक्के गुण प्राप्त करून प्रथम, वेदांत प्रविणराव सोलव या विद्यार्थ्याने 93.00 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर सार्थक दिनेश जाधव या विद्यार्थ्याने 91.40 टक्के गुण प्राप्त करून शाळेतून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे.तसेच शाळेतून 39 विद्यार्थी प्राविण्य आणि 24 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये सुद्धा आलेले आहेत ,,,,,,, वरील सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी जिद्द व मेहनतीने अभ्यास करून यश संपादन केल्याबद्दल या सर्वांचे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीशराव काळे,उपाध्यक्ष अरुणराव काळे, सतिशराव सोलव,सचिव मोहनराव गणोरकर, सहसचिव चंद्रशेखरराव टाकरखेडे,ज्येष्ठ संचालक राजेंद्रराव बेलसरे, अरुणराव फुटाणे,संजयराव बेले, प्रभाकरराव सावरकर, प्राचार्य मनोहर गणोरकर,पर्यवेक्षक उमेश काळे, वर्ग दहावीचे वर्गशिक्षक योगेश फुटाणे, प्रविण आकोटकर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

CLICK TO SHARE