आदिवासी बांधवांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत विरोधात उपोषण

धर्म

प्रतीनिधी:रवि वाहणे शेंदुरजनघाट

अमरावती:गेल्या दोन महिन्यांपासून करजगाव येथील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना कीटकांचा प्रचंड त्रास होत आहे. जेवण करताना जेवणाच्या ताटामध्ये, कापडांमध्ये, कपड्यांमध्ये व झोपल्यानंतर लोकांच्या अंगावर ही किटके चालतात. त्यामुळे लोकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेले आहे. संबंधित व्यक्तीला जाब विचारला असता त्याने एकदा मारहाण सुद्धा केली होती. दोन महिन्यांपासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व पोलीस स्टेशन अशा विविध विभागांमध्ये सतत पाठपुरावा करून देखील नागरिकांना न्याय मिळत नसल्याने त्रासाला कंटाळून आदिवासी बांधवांनी हा आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे. बिरजू धुर्वे,राहुल उईके,लालू युवनाते,मुन्नाजी कुमरे,जानूजी उईके,मनोहर धुर्वे,सुनील सिरसाम,रमेश सलामे असे एकूण आठ लोक उपोषणाला बसलेले आहेत.या उपोषणाला बिरसा क्रांती दलाचे तालुका संघटक राहुल उईके सुद्धा उपोषणाला बसले असून बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके व तालुका अध्यक्ष मनोज उईके यांनी सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. संबंधित विषयात योग्य वेळी योग्य कार्यवाही न झाल्यास बिरसा क्रांती दल मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्षांनी दिला आहे.* *या उपोषणाला सहकार्य करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये अश्विन बोहरूपी, उत्तम बिसांद्रे, जन आक्रोश संघटनेचे निरीक्षक अविनाशजी बिसांद्रे, रामकला धुर्वे, रिंगो कुमरे, आशा पंधरे, शोभा सलामे, सुनंदा सिरसाम, मालती धुर्वे, हिराबाई उईके, शिवम उईके, प्रणव धुर्वे, सुभाष कुमरे, सतीश धुर्वे, रामदास आहाके, गोलू उईके, मोतीराम धुर्वे, पूर्वी धुर्वे, प्रमोद युवनाते, अजब सोनवणे, सुरेश कुमरे, गौतम झाडोदे इत्यादी उपस्थित होते.

CLICK TO SHARE