तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगाव
आमची घरे असलेली जागेवर बोगस भूखंड तयार करून घर असलेल्या प्लॉटची जागा विक्री करणाऱ्या जमीन मालक, जमीन, विक्री करणारे दलाल, जागेवर न येता फेरफार नोंदी करणारे कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून आम्हाला न्याय देण्यात यावा अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार अशी व्यथा आज देवरी रोडवरील शेतात घर असलेल्या घरमालकांनी पत्रकार परिषदेत मागणी केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडताना पुढे सांगितले की, आमची देवरी रोड येथे वडिलोपार्जित शेतीचीजमीन असून गट क्रमांक २५८/३ चा जमीन मालक कवडू घनश्याम मेंढे यांनी एन ए करून जमिनीचे भूखंड काढून विक्रीस काढले म्हणजे परंतु गट क्रमांक २५८/१ जमिनीचे मूळ मालक ताराचंद भांडारकर, मन्नू शिवराम भांडारकर, उमेश नारायण राकडे, यांची वडीलोपार्जित घरे होती व आहेत परंतु कवळू मेंढे व दलाल यांनी गट क्रमांक २५८/१ बोगस कागदपत्राच्या आधारावर भूखंड काढले. गट क्रमांक २५८/१ मधील बोगस तयार करण्यात आलेल्या भूखंडावरील तलाठी यांच्याशी साठ गाठ करून फेरफार न करता वास्तव्यास असलेल्या घराला भूखंड दाखवून जागेची विक्री केली. त्यामुळे मूळ मालकाचे वास्तव्य असलेल्या जागेचे अस्तित्व धोक्यात आल्यामुळे वास्तव्यास असलेली जमीन मालक व भूखंड खरेदी करणारे हे यांची दिशाभूल करून जमीन विक्री केली असल्याचे निदर्शनास आले आहे. फसवणूक झाल्याचे बाब लक्षात येताच तहसीलदार तहसील कार्यालय आमगाव, उपविभागीय अधिकारी देवरी, यांचेकडे तक्रार नोंदविली. परंतु माननीय उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार साहेबाला चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतरही आज पर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई किंवा चौकशी करण्यात आली नसून प्रकरण दडपण्याचे काम तहसील कार्यालय व तलाठी करीत असल्याचे दिसून येत आहे. आमच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आम्ही वारंवार करीत असलेल्या तक्रारीवर कोणतीच कायदेशीर कारवाई होत नाही. व जमीन मालक, दलाल यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पत्राद्वारे निवेदन केले आहे की व बोगस भूखंड तयार करणारे जमीन मालक, दलाल व प्लॉटवर न येता फेरफार नोंदी करणारे महसूल विभागाचे कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही आत्मदहन करणार असे उपस्थित वास्तवास असलेले घरमालकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याच्या शेवटच्या प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. जर काही दिवसात कारवाई झाली नाही तर 5 जूनला सामूहिक आत्मदहन करणार असे त्यांनी स्पष्ट सांगितले. आयोजित पत्र परिषदेत प्रवीण चौरे, मन्नू भांडारकर, सौं अनिता उमेश राखडे, संगीता वाघुळदे, विजय हेमणे,त्रिवेणी सलाम इत्यादी उपस्थित होते.