नारसिंगी येथे टाटा एस गाडीचा झाला अपघात,रविवारी 5.45 वाजता घडली घटना

क्राइम

मुक्तापुर येथून काटोल येथे कॅटरिंग करिता जात असताना झाला अपघात नारसिंगी येथे झाला अपघात

गाडीतील 6 गंभीर जखमी रुग्णवाहीकेणे पाठवले नागपूरला

पोलिस उपनिरीक्षक पापिन रामटेके यांनी पत्रकारांशी अरेरावी

वेळे वर 108 रुग्ण वाहिकेत डिझेल नसल्यामुळे रुग्णांना नागपूर नेण्यास विलंब.

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा (त.2) मुक्तापूर येथून काटोल येथे कॅटरिंग करिता मजुरांना घेऊन जाणारा टाटा एस क्रमांक MH-40- CM – 2562 गाडी नारसिंगी येथे सायंकाळी 5.45 च्या सुमारास पलटी झाली गाडीत बसलेल्या 17 मजुरांन पैकी 9 मजुरांना दुखापत झाली असून त्यातील 6 मजुरांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठवण्यात आले आहे. रविवारी कॅटरिंग चे काम करण्याकरिता मुक्तापूर येथील मुल 5.30 च्या सुमारास मुक्तापूर येथून टाटा एस या गाडीत बसून निघाले असता सायंकाळी 5.45 वाजताच्या सुमारास गाडी नारसिंगी येथील कॉर्नरवर पलटी झाली. नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने गाडीतील सर्वांना उपचारासाठी जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले त्यांच्यावर प्रथमोउपचार करून करण्यात आले. यातील सागर मिलिंद शेंदरे वय वर्ष 22, यश शंकर वैद्य वय वर्ष 18, समिर मंगल इवणाते वय वर्ष 15, क्रिश दीपक हीवराळे वय वर्ष 15, प्रफुल जगदीश गिरडकर, वय वर्ष 18, निखिल किशोर हिवराळे वय वर्ष 15 याना गंभीर दुखापत झाल्यामुळे 108 रुग्ण वाहिकेने नागपूर येथे पाठवण्यात आले. तर मयूर रामदास वाडबुदे वय वर्ष 17, आदित्य मिलिंद शेंदरे वय वर्ष 15, ओम जीवन खाडे वय वर्ष 13 यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहे. सर्व राहणार मुक्तापूर येथील आहे. गाडी वेगाने असल्यामुळे चालकाला अंदाज न आल्यामुळे गाडीचा बलेन्स बिघडला व गाडी पलटी झाल्याचे रुग्णांनी सांगितले. वाहन चालक प्रवीण धार्मिक असून याला कसल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनाना करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक पपीन रामटेके यांची अरेरावी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना पाहण्यासाठी गेलेल्या पत्रकारा सोबत पोलिस उपनिरीक्षक पपीन रामटेके यांनी अरेरावीची भाषा करत तुम्ही कशाला आले, तुमचं काय काम आहे, बाहेर निघा, पाहून घेईल तुम्हाला अशी धमकी देत अरेरावीची भाषा केली.पत्रकारांना जर पोलिस धमकी देत असेल तर सामान्य नागरिकांशी कसे वागत असेल. त्यामुळे अरेरावीची भाषा करणाऱ्या व धमकी देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पपीन रामटेके विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी. तसेच या बाबत पोलिस अधीक्षक यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे पत्रकार यांनी सांगितले.108 रुग्ण वहिकेत डिझेल नसल्यामुळे रुग्णांना नेण्यास विलंब.अपघात झाल्या नंतर लगेच 108 रुग्ण वाहिका बोलावण्यात आली त्यातील एक रुग्णवाहीका रुग्णांना घेऊन लगेच नागपूर केली परंतु MH -14-CL-0854 या 108 रुग्ण वाहीकेत डिझेल नसल्यामुळे काही काळ रुग्णवाहीका उभी राहिली. रुग्णांच्या नातेवाईकाने डिझेलसाठी पैसे दिल्या नंतर चालकाने पेट्रोल पंपवर जाऊन डिझेल आणले त्या नंतर रुग्ण वहिका रुग्णांना घेऊन नागपूर येथे गेली.

CLICK TO SHARE