राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने किरणताई मोरे चव्हाण सन्मानित

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच रत्नागिरी या संस्थेकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातुन प्रस्ताव मागविण्यात आले होते त्यात सालेकसा येथील किरणताई मोरे चव्हाण यांनीही सामाजिक,साहित्यिक कार्याचा प्रस्ताव पाठवीला असता त्यांची निवड केली तसेच निवडपत्र देऊन त्यांना चंद्रपूर व गडचिरोलीतर्फे होणाऱ्या राज्यस्तरीय कविसंमेलन व पुरस्कार विरतरण कार्यक्रमात निमंत्रित केले होते परंतु काही कारणास्तव जाऊ न शकल्यामुळे त्यांना त्यांच्या निवासस्थानी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार पाठवून त्यांचा सन्मान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप शिल्ड,फ्रेम असलेले प्रमाणपत्र,मानपट्टा,बाबू एल एन हरदास यांचा क्रांतिघोष जयभीम काव्यसंग्रहअसे होते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव रत्नागिरी तर संस्थापक संपादक भावना खोब्रागडे चंद्रपूर आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री,स्वागताध्यक्ष संघमित्रा गेडाम होत्या त्यांना हा पुरस्कार भावनाताई खोब्रागडे यांनी पाठवला तेव्हा मनोज जाधव सर आणि आई बाबा आप्तस्वकीय मैत्रिनींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.