महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हिंगणघाट मध्ये नवीन कार्यकारणी
 
                                    
                                
अब्दुल कदीर बख्श ( हिंगणघाट )
आचार सहिता संपताच मनसेची नवीन कार्यकारणी जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा राज ठाकरे याच्या आदेशानुसार मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर सरायकर याच्या हस्ते पद जाहीर करण्यात आले व राज ठाकरे यांचा विचार घरो घरी पोहचवा असा संदेश देण्यात आला हा संपूर्ण कार्यक्रम मा जिल्हा अध्यक्ष शंकर पोटफोडे व जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर याच्या मार्गदर्शनात घेण्यात आला हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी पवन तडस यांची नियुक्ती करण्यात आली
तसेच हिंगणघाट चा संपूर्ण पदभार हा शहर अध्यक्ष म्हणून केतन तायवाडे यांच्या कडे सोपविण्यात आला
तसेच शहर संघटक स्वप्नील दाते,शहर सचिव योगेश नासरे,शहर उपाध्यक्ष रमेश राऊत,शहर उपाध्यक्ष कामेश बावणे,सर्कल अध्यक्ष सागर घवघवे,तालुका संघटक देवा काटकर,तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले,तालुका सचिव सुधीर बुरीले, इत्यादी नवीन कार्यकरणी गठीत करण्यात आली व उर्वरित पदे हे काही दिवसात जाहीर करू आणि जिल्हा अध्यक्ष यांचा कडून सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या व पक्ष् बांधणीचा आदेश पण देण्यात आला
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            