नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांची विवाह नोंदणी सुरू करा

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
वैद्यकीय अधीक्षकाना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
सालेकसा-सालेकसा नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने मागील सहा आठ महिन्या पासून बंद असलेली विवाह नोंदणी तात्काळ सुरू करण्यात यावे ह्या करिता वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सालेकसा यांच्या मार्फत जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांना राष्ट्रवादी काँग्रेस सालेकसा च्या वतीने निवेदन देण्यात आले.शासन निर्णयानुसार नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना विवाह नोंदणी ग्रामीण रुग्णालय येथे होत होती. पण काहीतरी तांत्रिक अडचणी व अन्य अडचणी मुळे विवाह नोंदणी होत नाही. ज्या जन्म मृत्यू नोंदणी पोर्टल वर हे प्रमाणपत्र मिळत आहे पण विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही. ज्याच्या नागरिकांना दर वेळी चकरा मारावा लागत आहे आणि त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या विषयाला गांभीर्याने घेऊन ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथिल दंत शल्य चिकित्सक डॉ. राजेश त्रिपाठी व कनिष्ठ लिपीक एस. एल. होळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसा तालुकाच्या वतीने निवेदन देण्यात आले. ह्या प्रसंगी शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, वरिष्ठ कार्यकर्ते डॉ. हिरालाल साठवणे, बाजीराव तरोने, घनश्याम बहेकार, बबलू मानकर, करण करवाडे, सोनू दशरिया व इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.