डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार सोहळा संपन्न

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार सोहळा रमाबाई आंबेडकर नगर शहीद स्मारक हॉल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख एड.अजय तापकीर संपर्कप्रमुख मनोज टेकाळे, एड. रिया करंजकर,रेखा काळे तसेच सुप्रिया जाधव,अभिनेत्री रंजीता पाटील,अभिनेत्री सारिका कांबळे इ.मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य गौरव सन्मान पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुधीर कांबळे यांनी ॲड.रणधीर तेलगोटे याच्या सामाजिक,शैक्षणिक राजकीय,हिंगोली नंदुरबार नांदेड या तीन जिल्ह्यात एकूण 150 गरजू मुलींसाठी स्व. सत्यभामा तेलगोटे यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती, दर महिन्याला प्रत्येकी 300 रु.वाटप या सर्वच कार्याची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर कांबळे यांनी अँड रणधीर श्रावण तेलगोटे यांना महाराष्ट्र राज्य गौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच हा कार्यक्रम 10 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. त्या निमित्ताने हिंगोली वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब बुद्ध विहार हर्ष नगर येथील सर्व महिला मंडळ यांनी ॲड. रणधीर तेलगोटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित महिला मंडळ उपा.उबारे,कसबे, मुळे,थोरात ,पंडि,आम्रपाली खंदारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन डॉक्टर सुनिती तेलगोटे यांनी केले.