मथुराई हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचा गृहप्रवेश व स्थलांतर सोहळा संपन्न
प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथील प्रसिद्ध वैद्यकीय सेवा देणारे डॉ. रामेश्वर मुरलीधर मोरे व डॉ. सारिका रामेश्वर मोरे यांच्या मथुराई सर्जिकल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन प्रशस्त इमारतीचा गृहप्रवेश व स्थलांतर सोहळा शनिवार दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.
मागील पाच वर्षांपासून मंगळवार बाजारपेठेत “मथुराई हॉस्पिटल” या नावाने कार्यरत असलेले हे रुग्णालय आता देशपांडे पेट्रोल पंपाच्या बाजूला, पोलीस वसाहतीच्या पाठीमागे नव्या सुसज्ज इमारतीत सुरू करण्यात आले आहे. पोटविकार, मूत्ररोग व जनरल सर्जरी या क्षेत्रातील तज्ञ डॉ. रामेश्वर मोरे यांच्याकडून परिसरातील रुग्णांना सातत्याने दर्जेदार सेवा मिळत असून नव्या इमारतीमुळे अधिक आधुनिक व विस्तृत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या प्रसंगी जनरल सर्जन तथा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मारुती क्यातमवार, डॉ. कराळे दांपत्य, डॉ. काळे, डॉ. अजय रोकडे तसेच मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून डॉ. मोरे दांपत्यास शुभेच्छा दिल्या.
नवीन इमारतीच्या सुरूवातीमुळे वसमत व परिसरातील रुग्णांना अधिक सोयीस्कर व अद्ययावत आरोग्यसेवा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.