स्व.अजितदादा पवार जयंतीनिमित्त वसमतमध्ये महा रक्तदान शिबिर,आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथे आज स्व.अजितदादा पवार दा पवार यांच्या जयंतीनिमित्त वसमत येथील मयूर मंगल कार्यालयात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषदादा बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैया नवघरे, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, तानाजीराव मुटकुळे यांचे नातू, बाळूमामा ढोरे, लक्ष्मीकांत भैया नवघरे, उमाकांत भैया नवघरे, विष्णुकांत भैया नवघरे, रवी बडवणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शिंदे ताई, देशमुख ताई, विश्वनाथराव फेगडे, तानाजी बेंडे, नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्या बाहेती, उपनगराध्यक्ष इमरान अली, माऊली बेंडे, नगरसेवक राजेश पवार, प्रभाकर शिरसागर, सौरभ जाधव, नगरसेवक राजकुमार एगळे, वाहुळे, आयफान चाऊस, खादर कुरेशी, छोटा नमु, अरुणभाई दालवाले, अब्दुल सत्तार तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सन्माननीय नगरसेवक आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.
दरम्यान, वसमत तालुक्यातील मौजे गिरगाव येथील काही कार्यकर्त्यांनी आमदार राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याचवेळी वसमत तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत आमदार राजूभैया नवघरे यांनी गंभीर दखल घेत महावितरणच्या संबंधित मंत्र्यांशी संपर्क साधून तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली.