भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श बाळगा:-सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : हिंगोली येथे तत्कालीन महामहिम राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त येथील माणिक स्मारक आर्य विद्यालयात, वाचन प्रेरणा दिनी दि. १५ गुरुवारी राष्ट्र पुरुषांचे चरित्र वितरण सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापक के. एस. राठोड, समर्पित सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मिसाईलमन तथा ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कार्य आणि उत्तुंग व्यक्तीमत्व सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी विशद केले. महामानव, राष्ट्रपुरुष, तेजस्वी जीवनाचे चरित्र वाचन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. वाचनातून प्रेरणा घेण्यासाठी निवडक ६८ विद्यार्थ्यांना राष्ट्र पुरुषांचे ग्रंथ वितरण करण्यात आले. शिक्षक-शिक्षीका, अभ्यंगत,पालकांची उपस्थिती होती.