स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या ८ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : हिंगोली आज हिंगोली येथे स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या ८ व्या पुण्यतिथी निमित्त हिंगोली येथे अभिवादन करण्यात आले.
येथील नामवंत सरजुदेवी भिकुलाल आर्य कन्या विद्यालयात स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल ८ व्या पुण्यतिनिमित्त मुख्याध्यापिका
एम. एस. गुंडेकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांच्या उपस्थितीत खादीचा सुत्रहार अर्पण करण्यात आले.
स्वतंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना समर्पित सर्वोदय कार्यकर्ते विशाल अग्रवाल म्हणाले, यशस्वी जीवनासाठी "वाचन, लेखन, अभिव्यक्ती" या त्रिसूत्रीचा अंगिकार करावा. सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगण्याचे आवाहन केले. शेकडो विद्यार्थीनींनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याचा संकल्प केला. विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षिकांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी महात्मा गांधीं यांच्या सेवाग्राम आश्रममाचे अध्यक्षपद भूषविले. सर्वोदच्या अध्यक्ष पदावरून महात्मा गांधी यांच्या रचना आणि विविध विधायक कार्यक्रम राबविले. सेंद्रिय शेती, खादी, स्वावलंबन कार्यक्रमातून वैचारिकता प्रसारित केली. ८ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.