काचनगाव जिल्हा परिषद शाळेस विविध क्रीडा साहित्याची भेट कु. श्रीधा ढोबळे यांचा स्तुत्य उपक्रम; शाळा व्यवस्थापन समिती, विध्यार्थी व शिक्षकांकडून आभार
तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर
बालक दिनाचे औचित्य साधून नागपूर येथील कु. श्रीधा प्रांजली मयूररराव ढोबळे (नागपूर )यांच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, काचनगाव येथील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आकर्षक क्रीडा साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास आणि क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट बॅट व स्टम्प सेट, टेनिस बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन रॅकेट, स्किपिंग रोप (दोरीउडी), फ्रिसबी, मार्कर कोन, लहान मुलांसाठी बॉलिंग सेट, भोवरे तसेच बुद्धीला चालना देणारे 'लुडो आणि सापशिडी' यांसारखे इनडोअर आणि आउटडोअर खेळण्याचे भरपूर साहित्य सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व शिक्षक म्हणाले की, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारची मदत अत्यंत मोलाची ठरते. या नवीन साहित्यामुळे विद्यार्थ्यांची खेळातील गोडी निश्चितच वाढेल."
नवीन क्रीडा साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या सामाजिक बांधिलकीबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश कापसे, सर्व सदस्य, मुख्याध्यापक सुनिल कुरटकर, शिक्षक प्रभाकर मांढरे, राजेंद्र मोघे, राजेंद्र धुर्वे, माधव काकडे, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या वतीने कु. श्रीधा प्रांजली मयूररराव ढोबळे (नागपूर ) यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.