तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत काचनगाव शाळेची उत्कृष्ट कामगिरी

Thu 08-Jan-2026,12:02 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर

वर्धा:वडनेर येथील नि.मु.घटवाई विद्यालयाच्या प्रांगणात नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काचनगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या स्पर्धेत सिनियर गट मुलांची लंगडी प्रकारात द्वितीय क्रमांक तसेच दौड मध्ये 100 व 200 मीटर सिनियर गट मुली तसेच लांब उडीत संस्कृती साटोने या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. 100 मीटर दौड ज्युनिअर गट दिव्या आस्टनकर तसेच बुद्धिबळ या प्रकारात कांचन खोडे प्रथम तर इंद्रजित आदमाने या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.