इंडिया एज्युकेशन अवॉर्ड 2025 से सम्मानित शेख कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट

Fri 19-Sep-2025,06:42 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक

वर्धा : नागपुर येथे आयोजित इंडिया एज्युकेशन अवॉर्ड 2025 या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात वर्धा जिल्ह्याचा मान वाढवणारा क्षण अनुभवास आला. संगणक शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी शेख कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे शाहरुख शेख आणि इमरान शेख यांना प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणे, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना संगणक व माहिती-तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या कार्यासाठी त्यांची सर्वत्र प्रशंसा झाली. त्याच कारणामुळे त्यांना हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला.

हा पुरस्कार पूर्व मिस इंडिया व बॉलिवूड अभिनेत्री सायली भगत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला एआयसीपीईचे संस्थापक व संचालक शरद टावरी व कविता टावरी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी शेख बंधूंच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना सततच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर शाहरुख शेख म्हणाले :

“हा सन्मान वैयक्तिक कार्यासाठी नसून वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे. शिक्षणाद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्यास आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे.”

कार्यक्रमावेळी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते, असे संस्थेचे प्राचार्य एस. आर. शेख यांनी कळविले आहे.