वाघाच्या हल्ल्यातील मूत्ताच्या कुटुंबीयांना धनादेश वितरण

Sat 01-Nov-2025,11:48 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : गोंडपीपरी तालुक्यातील मौजा गणेश पिपरी येथिल अल्का पांडुरंग पेंदोर (वय ४५) महीलेचा २६ ऑक्टोबर रोजी शेतात काम करीत असताना वाघाच्या हल्ल्यांत दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे पेंदोर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून (दि.३१)ला शासनामार्फत १० लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण मूत महीलेच्या कुटुंबीयांना करण्यात आले. वाघाच्या हल्ल्यांत मुत्यु पावलेल्या अल्का पेंदोर यांचा मूत्यु दुर्दैवी असुन शासनाकडुन मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या कुटुंबीयांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. यावेळी माझ्यासमवेत भाजपाचे गोंडपीपरी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पुन, तालुका महामंत्री सतिश वासमवार,के.उ.बा.समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे,माजी उपसभापती मनिष वासमवार, सरपंच कोरवते, गणेश मेरुखवार, रमेश दिंगलवार, मनोज वनकर, नितीन तुमडे,पंकज आमने, शैलेश विश्वकर्मा,रोहित गुलदेवकर, मारोती पोटे, बालाजी चापले, दिवाकर कुडे,शालीक आत्राम, शामराव पेंदोर, विठ्ठल रोहनकर, संदिप कुडे, मंगेश चौधरी, शेखर बोरुले, नितीन बोरुडे, शांताराम कुकुडकर,विवेक कुबडे, यांचेसह गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.