अजितदादा पवार यांच्या स्मूतीस बल्लारपूरमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली सभा
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २८ जानेवारी रोजी बल्लारपूर शहरातील विश्रामगृह परिसरात भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी वर्ग तसेच शहरातील अनेक गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, निलेश खरबडे, काशीनाथ सिंह, नासिर बॉक्स, पवन मेश्राम, बल्लू सेठ गिदवानी, इब्राहिम जवेरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी, विक्रांत पंडित, नगरसेवक प्रणीत सातपुते, नगरसेविका साजिया शेख, प्रशांत झामरे, बादल उराडे, अजिंक्य मारकवार, रोजिता ताजुद्दीन, अभिषेक मालू, राजू मुंदडा, श्रेयांश ठाकूर, आसिफ शेख, रवि बेजेल्ला आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच कमलेश शुक्ला, चेतन भोगले, अंकुश वर्मा, सोनू सिंग, सचिन तोटावर, सोनू श्रीवास, गुलाब यादव, संजू दिगवा, अर्चना बुटले, रोजिदा शेख, निर्मला सिंग, मल्लेश्वरी महेशकर, रितेश अलोणे, चिंटू सातपुते, रोशन बोमावर, दिनेश आसवानी, रघुवीर सोमाणी, ताहेर हुसेन, अरुण वाघमारे, घनश्याम बुरडकर, अविनाश मट्टा, मुकद्दर खान, अभिलाष चुनारकर, भास्कर पेंदोर, राजू गादेवार, संजू सूर्यवंशी, सचिन टेंभूरकर, वाल्मिक सूर्यवंशी, रिंकू टोपणकर यांचीही उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून ना. अजितदादा पवार यांच्या सामाजिक, प्रशासकीय व राजकीय कार्याचा आढावा घेत त्यांच्या नेतृत्वगुणांचा गौरव केला. त्यांच्या निधनाने राज्याने एक कर्तव्यदक्ष, लोकाभिमुख व अनुभवी नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून मौन पाळत दिवंगत नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.