मुनीर पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यस्तरीय शालेय समूह नृत्य स्पर्धा संपन्न
प्रतिनिधी :- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:औंढा जवळ बाजार येथे आज मा. मुनीर पटेल माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, त्यांच्या कलेला चालना मिळावी तसेच कलागुणी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन व्हावे या उद्देशाने दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी भव्य राज्यस्तरीय शालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन कारण्यात आले होते. 5 वी ते 10 वी च्या विध्यार्थ्यांसाठी हे बक्षीस होते 1 ). प्रथम बक्षीस 10001 रोख व स्मृती चिन्ह मा. रियाज कुरेशी मा. उपनगराध्यक्ष वसमत.
2).द्वितीय बक्षीस 7001 रोख व स्मृती चिन्ह सोनू चव्हाण युवक जिल्हाध्यक्ष रा.कॉ.पा (श.प.ग.). 3).तृतीय बक्षीस 5001 रोख व स्मृती चिन्ह गजानन डुकरे ग्रामविकास अधिकारी. उत्तेजनार्थ बक्षीस 1001 रोख चे 4 बक्षीसे संभाजी पाटील तालुका उपाध्यक्ष रा .कॉ.पा. औढा ( श. प. ग.)
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा मुळे अध्यक्ष इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळा बा.
कार्यक्रमाचे उदघाटक वैजनाथ भालेराव नायब तहसीलदार औंढा नाग. यांच्या हस्ते संपन्न झाले.