ऍड.बाबासाहेब वासाडे दीर्घ आजाराने व वृद्धपकाळाने निधन

Sat 20-Sep-2025,01:44 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर:शिक्षण,सहकार व राजकीय क्षेत्रात अग्रणी असलेले शिक्षण महर्षी ऍड बाबासाहेब वासाडे यांचे शुक्रवारी ( दि.१९ ) दीर्घ आजाराने व वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांचे मागे 3 मुले,सुना व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.वासाडे यांनी ग्रामीण भागातील मुलांना अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले.ते माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्ती होते.

कृषी जीवन विकास प्रतिष्ठान येनबोडी आणि शिक्षण प्रसारक मंडळ, मुलचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी ॲड. बाबासाहेब वासाडे यांचे वृद्धापकाळाने आज दिनांक १९/०९/२०२५ ला सायंकाळी ४-०० वाजता निधन झाले. उद्या दिनांक २०/०९/२०२५ ला सकाळी १०-०० वाजता त्यांच्या राहत्या घरून शांतीधामकडे अंत्ययात्रा निघणार आहे. भावपूर्ण आदरांजली.