शेतकऱ्याची खत खरेदीतून होणारी आर्थिक लूट थांबवा शेतकऱ्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी :-सध्या शेतीचे हंगाम सुरू असून हलक्या व मध्यम प्रतीचे धान गर्भावस्थेत असल्याने त्याला युरिया खताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे युरिया खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याची मोठी गर्दी कृषी केंद्रात पाहायला मिळते. मागणीनुसार खताचा पुरवठा कमी होत असल्याने कृषी केंद्रधारक शेतकऱ्याची आर्थिक लूट करीत आहेत.
तालुक्यात युरिया खताचा पुरवठा कमी होत असून युरिया खताची बँगची किंमत २६६/- रुपये असताना शेतकऱ्यांकडून ४०० ते ५०० रुपये प्रति बँग घेतली जाते. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे बिल दिले जात नाही. कृषी केंद्रधारक व कृषी विभाग यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. याबाबत कृषी विभागानी दोषी कृषी केंद्र धारकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. याबाबत आरमोरी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी देवानंद दुमाने,अंकुश गाढवे, हिवराज बोरकर, दशरथ मेश्राम, जियाऊल पठाण,संजय वाकडे शेतकरी उपस्थित होते.