केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी; वर्ध्यात महिला काँग्रेसचे आंदोलन
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी; वर्ध्यात महिला काँग्रेसचे आंदोलन
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
वर्धा | दि. ०५ मार्च २०२६ वर्धा शहरात आज राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या निर्देशानुसार वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय मंत्री Hardeep Singh Puri यांचे नाव कथित ‘एप्स्टीन प्रकरणा’शी जोडले जात असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.
आंदोलनादरम्यान “राजीनामा द्या, राजीनामा द्या!” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दुपारी २ वाजता Mahatma Gandhi Statue Civil Lines Wardha येथे झालेल्या या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली.
वर्धा जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. अरुणा धोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेत आक्रमक भूमिका घेतली.
या आंदोलनानंतर वर्धा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पुढे कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.