“मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नाते” — एहसान कुरेशी

Sat 21-Feb-2026,01:08 AM IST -07:00
Beach Activities

“मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नाते” — एहसान कुरेशी

वर्धा नावेद पठाण मुख्य संपादक 

“कोणत्याही स्वार्थाशिवाय आणि औपचारिकतेशिवाय मनापासून जपली जाणारी मैत्री ही जीवनातील सर्वात सुंदर नातींपैकी एक आहे. सुखात आनंद साजरा करणारी आणि दुःखात आधार देणारी ही नाळ जीवन समृद्ध करते. खरे मित्र आपल्या गुणदोषांसह आपल्याला स्वीकारतात. जिथे स्वार्थ असतो, तिथे खरी मैत्री नसते,” असे प्रतिपादन विनोदी कलाकार एहसान कुरेशी यांनी केले.

वर्ध्याचे कवी इमरान राही यांच्याशी जवळपास ४० वर्षांची मैत्री असल्याचे कुरेशी यांनी सांगितले. १९८५ साली दोघांनी साहित्य प्रवासास सुरुवात केली. पुढे अखिल भारतीय स्तरावरील कविसंमेलने व मुशायऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांच्या समकालीन कवी-लेखकांमध्ये किरण जोशी, राजेंद्र मालविय, नजर एटवी, इरफान झांस्वी, विजय आनंद दुबे, अब्दुल जब्बार, संजय नरेडी, सुमीत, गुरु सक्सेना आणि डॉ. कलीम कैसर यांचा समावेश होता. नजर एटवी व वर्ध्याचे कवी संजय नरेडी यांच्या अकाली निधनाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

कुरेशी यांनी सांगितले की, The Great Indian Laughter Challenge या मंचावरून त्यांना आपल्या विनोदी प्रतिभेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. तर इमरान राही यांनी उर्दू-हिंदी साहित्यात तीन गझलसंग्रह प्रकाशित करून स्वतंत्र ओळख निर्माण केली. चांगली मैत्री आनंद वाढवतेच, पण वैयक्तिक विकास व आत्मशोधालाही प्रेरणा देते. मित्र आपल्याला अधिक चांगला माणूस बनण्यास मदत करतात — म्हणूनच मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे, असे त्यांनी नमूद केले.

हे विचार त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे इमरान राही यांच्याशी भेटीदरम्यान व्यक्त केले. यावेळी माजी पोलिस उपआयुक्त चंद्रकांत उदगीरकर, अखिल भारतीय शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय सचिव किरण फुलझेले, मंगेश भोंगाडे, निलेश राऊत, दिलीप मोहले, एहसान राही, अविनाश दुपारे, संजय निसाळ आदी उपस्थित होते.