पायाला भिंगरी लावून गावा गावात शाखा उघडा , येणाऱ्या सर्व निवडणुकात शिवसेनेचा झेंडा फडकेल - आमदार संतोष बांगर

Fri 24-Apr-2026,01:54 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत येथील विधानसभा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसह लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकहाती झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहून आपल्या पायाला भिंगरी बांधत गावागावात शिवसेनेची शाखा उघडून सदस्य संख्या वाढवावी असे आवाहन शिवसेनेचे कळमनुरी विधानसभेचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी गुरुवारी केले.

वसमत येथे आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आमदार संतोष बांगर, ज्येष्ठ नेते डॉ जयप्रकाश मुंदडा, तालुकाप्रमुख राजू चापके शहर प्रमुख क्षीरसागर यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार संतोष बांगर यांनी येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात आलेली मरगळ झटकून कामाला लागावे तसेच जास्तीत जास्त सदस्य नोंदणीवर भर द्यावा असे सांगून येणारी लोकसभा विधानसभा व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आपलाच प्रबल्य राहील असे सांगितले. 

यावेळी संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी येत्या पंधरा दिवसात मला प्रत्येक गावात शाखा आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचे नावाची यादी द्यावी असे सांगितले. आगामी काळात वसमत सह हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे सांगून आता इथून पुढे हार तुरे ऐवजी फक्त आणि फक्त पक्ष वाढीचा कामाचा आढावा घेतला जाईल असे सांगितले. 

अन् कार्यकर्ते भडकले.

संपूर्ण झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत अनेक इच्छुकांची आमदार राजू नवघरे यांच्याकडे एबी फॉर्म सोपवल्याने नाचक्की झाली होती. त्यावर काही कार्यकर्त्यांनी याचा जाब विचारत उपस्थित पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले होते .