अल्लीपुरात ३० वर्षीय युवकाची आत्महत्या

Wed 28-Oct-2026,09:16 AM IST -07:00
Beach Activities

अल्लीपुरात ३० वर्षीय युवकाची आत्महत्या

राहत्या घरी गळफास घेऊन संपवले जीवन; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

अल्लीपूर | प्रतिनिधी सुनील हिंगे

अल्लीपूर येथील सदानंद वॉर्डातील रहिवासी सागर हरिभाऊ मेश्राम (वय ३० वर्षे) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरात कोणीही नसताना सागर मेश्राम याने गळफास घेऊन जीवन संपवले. त्याच्या कुटुंबात आई आणि मोठा भाऊ असून, वडिलांचे त्याच्या लहानपणीच निधन झाले होते. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार संगीता हेलोंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास अल्लीपूर पोलीस करीत आहेत.