आतिश भैय्या दांडेगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून टेंभुर्णी मधील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Sun 25-Oct-2026,02:48 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी सर्कल परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा कपिश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आतिश भैय्या दांडेगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी आतिश भैय्या दांडेगावकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या ठिकाणी पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि सर्वसामान्य नागरिकांची सेवा करणे, यावर भर दिला. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता, सर्वसामान्य नागरिकांना आवश्यकतेनुसार मदत करावी, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आपल्या परिसरात योग्य नियोजन करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही आतिश भैय्या दांडेगावकर यांनी आपल्या भाषणातून केले. जनतेच्या संकटाच्या काळात कार्यकर्त्यांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून जनसेवेला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

आतिश भैय्या दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये ॲड. निळकंठ सवंडकर, ज्ञानेश्वर सवंडकर, गोविंद सूर्यवंशी, रमेश सवंडकर, प्रसाद सवंडकर, माधव सवंडकर, दिनेश सवंडकर, पांडुरंग सवंडकर, बबू सवंडकर, विकास सवंडकर, गणेश सवंडकर, शंकर सवंडकर, दत्तराव सवंडकर, दत्तराव रुस्तुमराव सवंडकर, ओमा सवंडकर, त्रिंबक सवंडकर, नारायण सवंडकर, भैय्या पाटील, गणेश सोनवणे, शिवशंकर सवंडकर, वसंता सवंडकर आणि विठ्ठल थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

यावेळी ग्रामीण पूर्व मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर मुंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष विजय कडतन, रवी पाटील नादरे, दौलत हुंबाड, गणेश कमळू, भगवानराव कावळे, संजय काकडे, जयवंतराव सवंडकर, संदीप भालेराव, आबासाहेब सवंडकर, गोविंद एजगे, अमोल मुळे, राजेश भालेराव, तुकाराम साळवे, ग्यानोबा काळे, गजानन पप्पलवाड, गोपाळ महाजन, प्रवीण पोफाळकर, अनुज काकडे, सुदाम भालेराव, अक्षय अवधूतवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.