सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ वनांचल वेल्फेअर फाउंडेशनचा अनोखा उपक्रम चहा व शुद्ध पाण्याचे वाटप
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर : सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश सातत्याने देणाऱ्या वनांचल वेल्फेअर फाउंडेशन, बल्लारपूरच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत चहा व शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमातून सामाजिक एकजूट, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. कत शहरात "पहाटेचे प्रहरी" म्हणून ओळखली जाणारी वनांचल वेल्फेअर फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीसाठी त विविध जनजागृतीपर उपक्रम राबवत आहे. नियमित व्यायाम, स्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच समाजहिताच्या विविध प्रश्नांवरही संस्था जून सक्रिय भूमिका बजावत असते.
वनांचल वेलफेअर फाउंडेशन, बल्लारपूर सोनम वांगचुक यांच्या मामला वांगचुक यांच्या सोनम आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात उपस्थित नागरिकांना चहा व शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकहिताच्या प्रश्नांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थितांनीही या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेच्या सामाजिक कार्याचे अभिनंदन केले.जाहीर शांतीपूर्वक पाठींबा
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष अजय दुपारे, उपाध्यक्ष संजय ढोके, कोषाध्यक्ष चंद्रहर्ष भगत, तसेच संतोष बोरकर, कुसराम सर, प्रवीण थूल, प्रदीप कांबळे, अशोक भाऊ, अमोल भाऊ, गौतम भाऊ आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला असून सामाजिक प्रश्नांबाबत नागरिकांनी सजग राहण्याची गरजही अधोरेखित झाली.