तिर्थदर्शन योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना मिळतो लाभ 40 भाविक भक्त पंढरपूरला रवाना
तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उक्रमाअंतर्गत
दि. 19/1/2026 सोमवार रोजी,,,, अल्लीपूर गावातून एसटी महामंडळ हिंगणघाट आगाराची बस पंढरपूर दर्शना करिता 40 ग्रामस्थ,,, महिला,, आणि तरुण... यात सर्व सहभागी होते, गेल्या 2 ते 3 वर्षा पासून हा तीर्थ योजनेचे कार्य आपला हिंगणघाट आगार करत आहे. गावकरी आणि आजूबाजूच्या गावातील गावाकऱ्याचा यात समावेश मोठया प्रमाणात आहे. याचे खरे श्रेय हिंगणघाट आगाराचे डेपो मॅनेजर शेंडे साहेब. बस स्थानक प्रमुख सडमाके साहेब आणि त्यांची टीम, आज या योजनेची खरी अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यातील पाच डेपोपैकी हिंगणघाट डेपो नंबर वन वर आहे येथून दर रविवार ला एक दिवसीय ट्रीप तीर्थ दर्शन व महिन्यातून दोन ट्रीप पंढरपूर ला जाते यामुळे खूप खूप गावकरी हिंगणघाट बस डेपोची स्तुती करत आहे. असाच नेहमीतीर्थ दर्शनाचा लाभ मिळो ही अपेक्षा अल्लिपूर व आजू बाजूच्या खेड्यातील गावकरी डेपो मॅनेजर ला आमुच्या एच टी न्यूज च्या माध्यमातून करित आहे.