लोकपरंपरा,लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणे समाजाची सामूहिक जबाबदारी-खासदार डॉ नामदेवराव किरसान
 
                                    
                                जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी :आदिवासी समाज निसर्गाला आपले दैवत मानतो. आदिवासी समाज हा जंगलाचा रहिवासी असून जंगलातून मिळणाऱ्या उपजावर आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे जंगल आणि आदिवासी समाज यांची नाळ जोडली गेली आहे.तसेच आदिवासींच्या सक्षमतेवर अधिक भर देण्याची गरज आहे.क्रांतिवीर बिरसा मुंडा,बाबुराव शेडमाके यासह इतर महापुरुषाच्या स्मृती जागृत करणे तसेच या माध्यमातून तरुणांना प्रेरणा मिळऊन आदिवासी समाजाने उच्च शिक्षण क्षेत्रात पुढे आले पाहिजे.आदिवासी समाज हा जिद्दी आणि कष्टाळू आहे.त्याचबरोबर त्यांना त्यांचे हक्क ,शिक्षणाची जोड मिळाल्यास हा समाज अधिक प्रगती करू शकेल. समाजातील सर्व लोकांनी लोकपरंपरा, लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणे समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन खा.नामदेवराव किरसान यांनी केले.कुरखेडा तालुक्यातील उराडी येथे मुलनिवासी आदिवासी गोंड समाज, गोंडवाना बहुद्देशीय समिती क्षेत्र कढोली यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद विर बाबुराव शेडमाके व राणी दुर्गावती मडावी तथा क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण व भव्य कोया पुनेम संमेलन काल गोटुल भुमी वर काल आयोजित करण्यात आले ते वेळी अध्यक्षियस्थानावरून डॉ नामदेवराव किरसान बोलत होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार रामदास मसराम मनोजसिग मडावी ,माजी जिल्हा परिषद सदस्य नंदु नरोटे नायब तहसीलदार नरेंद्र हलामी जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम सरपंच सोनु वटी निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक पेन्दाम दत्तात्रय श्रीसागर महाराज प्रा अनिल होळी क्रांती केरामी माजी पंचायत समिती उपसभापती टेटु पाटील नाकाडे बाबासाहेब ठाकरे पोलीस पाटील भास्कर वैरागडे उपसरपंच राधेश्याम दडमल टेडु पाटील नाकाडे सुनील चौधरी गोपिनाथ कोटागले शामराव पेन्दाम कालीदास कोल्हे चव्हारे सरगणेश वरखडे रामचंद्र काटेगे शकर सुकारे संतोष शेडमेक नितेश करगामी राजेंद्र वटी शालिक जनबधु यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी सांगितले की शहिद विर बाबुराव सडमाके यांनी जुल्मी ईग्रजाना सळोकी कीपळो सोडल त्याची आढवण व्हावी या निमित्ताने समाज एकत्र व्हावे यासाठी आपण जरी काही लोकाचे विचार वेगळे असले तरी माझे विचार तुमच्या बरोबर आहेत तसेच आजचे वैधानिक युग असल्यामुळे शिक्षण हे अतिमहत्त्व आहे आदिवासी विध्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपला जीवन उचवावा असे बोलले याप्रसंगी गावातुन रैली काडुन शहिद विर बाबुराव सडमाके याच्या पुणकृती पुतळ्याचे अनावरण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम उराडी कढोली सावलखेडा कराडी सोनेरागी टोला भगवानपुर वासी वासीटोला येथील समस्त गोडीयन समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता सपुण उराडी येथील गावकऱ्यांचा सहकार्य लाभलेया कार्यक्रमाचे संचालन संजय कुमरे यांनी केले तर प्रास्ताविक युवराज मरस्कोले यांनी केले तर आभार राजेंद्र वटी यांनी केले.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            