आमदार उमेश यावलकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले भवनाला स्वदिच्छ भेट देत पहाणी केली

Mon 22-Sep-2025,08:49 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी दिनेश डहाके पुसला 

वरूड:महाराष्ट्रातील वरूड मोर्शी मतदार संघाचे भाजपाचे आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांनी सोमवार दि.२२ सप्टेंबर रोजी मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाल येथील इ-५ अरेरा कॉलनी मधील महात्मा ज्योतिबा फुले भवनाला स्वदिच्छ भेट देत पहाणी केली. या भेटीदरम्यान येथील माळी समाजाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हाधिकारी जी.पी.माळी,महासचिव राजेंद्र अंबाडकर,सतीश चुके,रामचरण माने,मधुकर अंबाडकर,तपाडीया,ओंकार साळवीकर आदि मान्यवरांनी आ.उमेश यावलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.