आमदार रात्रुभैय्या नवघरे यांच्या हस्ते विद्याथ्याना साहित्याचे वाटप

Thu 16-Oct-2025,07:00 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत येथील आकोली.आज दि. 16/10/2025 रोजी जि.प.प्रा.शाळा आकोली येथे वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार नवघरे यांच्या वाढ‌दिवसाच्या निमित्ताने शिवराज कदम यांच्या वतीने शाळेतील सर्व विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शा.व्य.स.अध्यक्ष आनंदराव कदम व शाळेचे मुख्‌याध्यापक बी.जी. परी यांनी आम‌दार यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.याप्रसंगी बोलताना आमदार यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे.स्पर्धात्मक परीक्षांसाठी विदयार्थ्यांना तयार करावे, अशा सूचना केल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील,शिक्षक अशफा क शेख,श्रीरंग नरवाडे ,संतोष सातपुते , संगीता मुळे,राजु देवणे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष कोम्पलवार यांनी केले तर सुमीत यन्नावार यांनी सर्वांचे आभार मानले.