शौर्य,अभिमान आणि देशभक्तीचा जयघोष तिरंगा यात्रा-मोर्शी

Thu 22-May-2025,09:50 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी मंगेश बावणे मोर्शी 

मोर्शी:पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या या यशस्वी कारवाईचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे.भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज मोर्शी येथे भारतीय सेना सन्मान समितीतर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.ही यात्रा रामजीबाबा चौक, सुर्योदय चौक, गुजरी बाजार, गांधी चौक, मेन मार्केट ते जयस्तंभ चौक या मार्गाने पार पडली.“भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.